पांगरी (गणेश गोडसे)  दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोन शस्त्रधारी तरुणांना पकडण्यात पांगरी पोलिसांना यश आले असून अन्य चौघेजण पळून गेल्याची घटना पिंपळवाडी ता.बार्शी शिवारातील अन्नपूर्णा मंदिरामागे घडली.राहुल आबा काळे वय 25 रा.खामकरवाडी ता. वाशी जि. उस्मानाबाद व मच्छिंद्र  वसंत काळे वय 40 रा. पिंपळगाव ता.वाशी(हल्ली येरमाळा ता.कळंब )अशी पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे असून अन्य चौघे  पळून जाण्‍यात यशस्‍वी झाले.
     पोलिस नाईक प्रमोद केकान यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की पिंपळवाडी येथील अन्नपूर्णा मंदिराच्या पाठीमागे कोणीतरी अनोळखी सहा तरुण संशयास्पद रित्या बसलेले असल्याबाबत पिंपळवाडी ग्रामस्थाकडून माहिती मिळाल्यावरून अधिकार्‍यांसह त्यांनी घटनास्थळावर जावून पहाणी केली असता दोघांना ताब्यात घेण्यात त्यांना यश आले.त्यांच्याकडुन धारदार शस्त्र,मीरचीची पूड,कटावणी आदि साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.घटनास्थळी बार्शीचे उपविभागीय अधिकारी सर्जेराव ठोंबरे यांनी भेट देऊन ग्रामस्थांना धीर दिला.पांगरी पोलिसात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पांगरीचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ हे करत आहेत.
 
Top