उस्मानाबाद - येथील श्रीतुळजाभवानी क्रीडा संकुल, उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन कार्यक्‌रमांतर्गत  आपत्ती, संकाटाच्यावेळी काय करावे, कशा प्रकारची पूर्वतयारी करावी याचे प्रत्यक्षीकांचा कार्यक्रम येत्या 12 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते सकाळी 10-30 या वेळेत  एन. डी. आर. एफ, पुणे यांनी सादर  करणार आहेत.
               सर्व जनतेनी ‍विविध सर्व कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, महिला मंडळ, युवा युवक मंडळ, गणेश मंडळ, क्रीडा संघटना, शाळा, महाविदयालयातील शिक्षक व  विदयार्थ्यांनी  मोठया संख्येने ‍उपस्थित राहून आपत्ती व्यवस्थापनाच्या राष्ट्रीय कार्यात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन  प्राधिकरणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत नारनवरे यांनी यांनी केले आहे.
 
Top