उस्मानाबाद -  सामाजिक न्याय विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना देण्यात येणारी भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती ही योजना 2014-15 या वर्षापासून ऑनलाईन करण्यात आली असून या योजनेत कागद, काच व पत्रा वेचणाऱ्या पालकांच्या मुलांचाही समावेश करण्यात आलेला आहे.
        सदर योजनेची माहिती देण्याकरिता यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद उस्मानाबाद येथे दि.5 डिसेंबर, 2014 रोजी एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर बैठकीस जिल्हयातील सर्व शैक्षणिक संस्थेचे मुख्याध्यापक,                          गटशिक्षणाधिकारी  यांनी उपस्थित राहावे.
             मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील/संस्थेतील विद्यार्थ्यांचे अस्वच्छ व्यवसाय मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीचे प्रस्ताव/अर्ज ऑनलाईन भरुन ऑनलाईन प्रिंटसह मुळ प्रस्ताव गट शिक्षणाधिकारी  तसेच विस्तार अधिकारी (शिक्षण) यांचे मार्फत छानणी करुनच समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, उस्मानाबाद सादर करण्याचे  आवाहन करण्यात येत आहे. सदर शिष्यवृत्तीपासून विद्यार्थी वंचित राहिल्यास त्याची जबाबदारी संबंधित शाळेचे/संस्थेचे मुख्याध्यापक यांची राहील. 
 
Top