उस्मानाबाद -  खुल्या प्रवर्गातील किंवा ज्या प्रवर्गासाठी महाराष्ट्र शासनाचे महामंडळ अस्तित्वात नाही, अशा प्रवर्गातील आर्थिक मागास असलेल्या लाभार्थीसाठी महाराष्ट्र शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना केली असून या महामंडळामार्फत बीजभांडवल कर्जाची  योजना राबविण्यात येत आहे.
          या योजनेअंतर्गत 5 लाखाच्या प्रकल्प मर्यादा असलेल्या व्यवसायाकरीता कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यामध्ये बॅंकेचा सहभाग 60 टक्के असून उमेदवारांचा सहभाग 5 टक्के व 35 टक्के रक्कम महामंडळाकडून बीजभांडवल म्हणून देण्यात येते. सदर 35 टक्के रक्कमेवर 4 टक्के दराने व्याज आकारण्यात येते. कर्ज परत फेडीचा कालावधी 5 वर्षाचा असल्याची माहिती जिल्हा रोजगार व स्वंयरोजगार मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक रमेश पवार यांनी  दिली  आहे.
      कर्जवितरण सुलभ, तत्पर, पारदर्शक व्हावे व गरजूंना सहज कर्ज मिळावे, यासाठी महामंडळातर्फे आता HYPERLINK "http://www.mahaswaymrojgar.maharashtra.gov.in या" www.mahaswaymrojgar.maharashtra.gov.in या संकेतस्थळाची निर्मिती केली असून इच्छुकांनी या संकेतस्थळाचा वापर करुन ऑनलपाईन अर्ज करावा. यात उमेदवारास पात्रतेनुसार सुयोग्य स्वयंरोजगार योजनेचा शोध घेणे, उमेदवारांनी स्वयंरोजगार कर्ज अर्ज ऑनलाईन भरणे, कर्ज योजनेसाठी आवश्यक पात्रता, अटी व शर्ती, कर्ज मंजूर होण्यापुर्वी तसेच कर्ज मंजूर झाल्यानंतर सादर करावयाची कागदपत्र आदि माहिती उपलब्ध करुन देणे, ऑनलाईन सादर केलेल्या अर्जाची सदयस्थिती तपासणे, कर्ज फेडीची सदयस्थिती पाहणे, कर्ज फेडीच्या हप्प्त्याची परिगणना (इएमआय  कॅल्क्युलेटर) करणे, उमेदवारांच्या अडचणी निराकरण करण्यासाठी हेल्पलाइनची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून त्याचा  क्रमांक 022-28342521/2/3/4/5 असा आहे. गरजूंनी या योजनेचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा,असेही आवाहन करण्यात आले आहे.
 
Top