उस्मानाबाद -  जलस्वराज्य टप्पा क्र . 2 कार्यक्रमातंर्गत अभियांत्रिकी तज्ञ, (सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन/ पाणी गुणवत्ता तज्ञ), ग्रामलेखा समन्वयक, सल्लागार पाणी गुणवत्ता,   या कंत्राटी पदाच्या पात्र उमेदवारांच्या गटचर्चा/ मुलाखती खालील दिनांकास घेण्यात येणार आहेत.
     यानुसार अभियांत्रिकी तज्ञ, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन/ पाणी गुणवत्ता तज्ञाची मुलाखत 23 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता, ग्रामलेखा समन्वयकाची दुपारी     12-30 वाजता आणि सल्लागार पाणी गुणवत्ताची गटचर्चा व मुलाखती 24 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता घेण्यात येणार आहे.
    पात्र उमेदवारांच्या यादया जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद, उस्मानाबाद, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद, उस्मानाबाद  येथील नोटीस बोर्डावर डकविण्यात आली असून तसेच उस्मानाबाद जिल्ह्याच्या http://osmanabad.nic.in    या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
या कंत्राटी पदासाठी पात्र उमेदवारांनी मुलाखतीस उपस्थित रहावे येताना पात्रतेची मुळ कागदपत्रे, जन्मतारखेचा पुरावा, अनुभवाचे मुळ कागदपत्रासह व सर्व सांक्षाकित सत्यप्रतीच्या एका संचासह येथील कै. यशवंताव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद, उस्मानाबाद येथे उपस्थित रहावे, मुलाखतीस उपस्थित राहण्यासाठी कोणत्याही प्रकारचा प्रवासभत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
 सदर कंत्राटी पदाची भरती प्रक्रियेचे सर्व अधिकार अध्यक्ष निवड समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी,  जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांचेकडे राखून ठेवण्यात आले आहे, याची संबंधितानी नोंद घ्यावी, असे सदस्य  सचिव  तथा उप मुख्य कार्यकारी  अधिकारी        ( पाणी पुरवठा स्वच्छता) जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी कळविले आहे. 
 
Top