उस्मानाबाद - नियोजन विभाग, यशवंतरराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी  यशदा व अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या संयुक्त विदयमाने मासिक दरडोई उपभोगिता खर्च जुलै- 2014 पासून सर्वेक्षणाचे  जिल्ह्यात सुरु असून ते काम जुलै 2015 पर्यंत चालणार आहे. या कार्यास नगर परिषदेचे नगरसेवक तथा ग्रामपंचायतीचे सरपंचानी सहकार्य करावे, असे आवाहन यशदाचे डॉ. मिनल नरवने, विनय कुलकर्णी, अतुल नवबदे, काळे कांदबरी यांनी केले आहे.
    जिल्हा, तालुका शहारी व ग्रामीण भागात सर्वेक्षण करण्‍यात येणार असून या माहितीचा उपयोग राज्याच्या नियोजनाकरीता तसेच योजना आखण्याकरीता करण्यात येणार आहे. सर्वक्षण कार्यात यशदाचे श्रीमती पार्वती गावकरे, स्वप्नाजा नाईक, बाजीराव पवार हे उस्मानाबाद जिल्हा समन्वयक म्हणून  शंकर परांडे हे काम पाहत आहे.
    सांख्यिकी विभागाचे जिल्हा सांख्यिकी अधिकारी  एस. ए. थोरात, सांख्यिकी सहाय्यक लोमटे बी. एल मार्गदर्शन करणार आहेत.  सदरील माहितीचा उपयोग सन-2016 मध्ये तयार होणाऱ्या मानव विकास अहवालासाठी वापर  तयार करण्यात येणार असल्याची माहिती यशदाचे संचालक, (माविकें) डॉ. मीनल नरवणे यांनी दिली.
 
Top