उस्मानाबाद -  एकात्मिक बाल विकास
सेवा योजना प्रकल्प, तेर ता. जि.उस्मानाबाद अंतर्गत  मिनी अंगणवाडी  सेविका 1  सेविका व मदतनीसाची 5 पद मानधनी पध्दतीच्या  आधिन राहून पद भरण्यात येणार आहे.  पद भरतीबाबतचे विहीत नमुन्यातील अर्जाचे   वाटप 8 डिसेंबरपासून ते 17 डिसेंबर पर्यंत होणार असून  पात्र व इच्छुक महिलांनी विहित नमुन्यात अर्ज 17  डिसेंबरपर्यंत भरुन पाठवावेत, असे आवाहन एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी, तेर, ता. उस्मानाबाद यांनी  केले आहे.
    तेर प्रकल्पाअतर्गत उस्मानाबाद तालुक्यातील तेर व कोंड येथे मदतनीसाची प्रत्येकी 2 पदे,  ढोकी येथे 1 व वरुडा पारधीवस्ती मिनी अंगणवाडी सेविकाची 1 पदे भरण्यात येणार आहे. विहीत अर्ज व त्यातील सर्व रकाने अर्जदाराने भरावयाचे असून अंगणवाडी मदतनीस पदासाठी किमान इयत्ता 7 वी उत्तीर्ण असावे. वरील सर्व पदासाठी वयोमर्यादा अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी किमान 21 वर्ष व कमाल 30 वर्ष असावे.
    अर्जदार महिला ही ज्या गावात अंगणवाडी केंद्र कार्यरत आहे त्या गावातील रहिवासी असणे आवश्यक आहे. यासाठी रहिवासी असल्याचे गावच्या ग्रामसेवकांचे रहिवासी  प्रमाणपत्र जोडावे, या पदासाठी लहान कुटुंबाची अट लागू असून त्याबाबत अर्जदारांने रुपये 100 रुपयाचे बाँडपेपरवर विहीत नमुन्यातील प्रतिज्ञापत्र सादर करणे बंधनकारक राहील.
    एका पदासाठी एकच अर्ज करावा. अंगणवाडी सेविका  व मदतनीस या दोन्ही पदासाठी इच्छुक असल्यास दोन स्वतंत्र अर्ज करावे, सादर करण्यात येणाऱ्या सर्व कागदपत्रावर सक्षम अधिकाऱ्याचे साक्षांकन आवश्यक आहे. प्रकल्प कार्यालयाने प्रमाणित केलेले अर्जच स्वीकारण्यात येतील. विहीत नमुन्यातील अर्ज  कार्यालयीन वेळेत, सुटीचे दिवस सोडून स्वीकारले जातील. ‍अधिक   माहितीसाठी याची संबंधित महिलांनी नोंद घ्यावी, असेही बाल विकास प्रकल्प अधिकारी, तेर, ता. उस्मानाबाद यांनी कळविले
 
Top