बार्शी -  तालुक्यातील स्थानिक कलाकारांनी विनाअनुदानित शिक्षकांच्या जीवंत प्रश्‍नावर सादर केलेल्या सर या लघुचित्रपटाचे मोठ्या गर्दित व उत्साहात स्वागत करण्यात आले. रविवारी दि
    या प्रिमियर साठी निवासी नायब तहसिलदार उत्तम पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक हर्षल एकरे, डॉ.वैशाली साठे, डॉ.ढगे, अशोक ढगे, प्रा.हरिश्चंद्र भोसले, शरीफ सय्यद, महादेव आवारे, किशोर देशमुख, कलाकार विठ्ठल काळे, अस्मि जैन, रामचंद्र इकारे व सहकारी उपस्थित होते.
    राज्यातील एकामागून एक शेतकर्‍यांच्या कर्जबाजारीपणा, निसर्गाचा कोप व इतर कारणास्तव आलेल्या नैराश्येतून आत्महत्या झाल्या व होत असतांना, त्या प्रकारची किंबहुणा त्याहून भयंकर विदारक परिस्थिती शिक्षकांची नोकरी करणार्‍या परंतु केवळ विनाअनुदानीत नावाखाली वेतनाच्या प्रश्‍नाने त्रस्त असलेल्या राज्यातील शिक्षकांची परिस्थिती झाल्याचे वास्तव सर या लघुपटातून दर्शविण्यात आले आहे.
.१४ रोजी वैराग (ता.बाशी) येथील रोशन टॉकीज येथे हा प्रिमीयर शो दर्शविण्यात आला.
 
Top