उस्मानाबाद - टंचाईग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने सोमवारी उस्मानाबाद जिल्ह्यातील उपळाई आणि घोगरेवाडी या गावांना भेटी दिल्या. केंद्र शासनाच्या कृषी विभागाचे सचिव प्रवेश शर्मा यांच्या नेतृत्वाखालील चार सदस्यीय पथकाने टंचाई परिस्थितीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांची परिस्थितीही समजावून घेतली.
    बीडहून हे केंद्रीय पथक सायंकाळी साडेपाच वाजता उपळाई (ता. कळंब) येथे दाखल झाले. या पथकात केंद्रीय कृषी सचिव श्री. शर्मा यांच्यासह केंद्रीय विद्युत संचालनालयाच्या संचालक वंदना सिंघल,  केंद्रीय कृषी विभागाचे संशोधन अधिकारी व्यंकट नारायण अन्जिना आणि केंद्रीय ग्रामविकास खात्याचे उपसचिव गुलझारीलाल यांचा समावेश होता. या पथकाने उपळाई येथील एका शेतकऱ्याच्या चिंचेच्या बागेची पाहणी केली. पाणी नसल्याने ही बाग संपूर्णपणे वाळून गेल्याचे पथकाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जि.पच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांच्यासह खासदार प्रा. रविंद्र गायकवाड, आमदार राणा जगजीतसिंह पाटील, कृषी सहसंचालक श्री. देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारीही उपस्थित होते.
यावेळी श्री. शर्मा यांनी  उपळाई येथे स्थानिक शेतकरी आणि लोकप्रतिनिधींचेही म्हणणे ऐकून घेतले. सलग तीन वर्ष अपुरा पाऊस झाल्याने यावर्षी टंचाईची तीव्रता जास्त असल्याचे शेतकऱ्
त्यानंतर हे पथक घोगरेवाडी येथे पोहोचले. पावसाअभावी कोरड्या पडलेल्या तलावाची त्यांनी पाहणी केली. याशिवाय, नागरिकांशी संवाद साधून रोजगार हमीची कामे सुरु आहेत का, शेतीची कामे बंद असतील तर रोहयोच्या कामांकडे मजूर येतात ना, आदींबद्दलही विचारणा केली. याशिवाय, स्थानिक भागात येणारे पीक, खरीप आणि रब्बी हंगामाची स्थिती आदींबाबतही त्यांनी माहिती घेतली. स्थानिक शेतकऱ्यांना दिलासा देत हे पथक लातूरकडे रवाना झाले.    
यांनी या पथकाला सांगितले. यावेळी पथक सदस्यांनी प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचीही माहिती घेतली.  जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी त्यांना जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
 
Top