उस्मानाबाद - जिल्ह्यातील नवयुवक तरुण-तरुणीना सूचित करण्यात येते की, सैन्य व पोलीस दलात भरती होवू इच्छिणा-या युवक-युवतींना आवश्यक असलेले भरतीपूर्व प्रशिक्षण घेता यावे, यासाठी महाराष्ट्र माजी सैनिक महामडळ मेस्कोव्दारे (मेस्को) कॅरिअर अकॅडमी करंजे नाका, सातारा येथे  116  वे भरतीपर्वू प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचा लाभ पात्र युवक-युवतींनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने (नि) यांनी केले आहे.
         हे प्रशिक्षण दि 6 जानेवारी ते 2 मार्च 2015 या कालाधीत घेण्यात येणार असून यात राहण्याची, जेवणाची सोय करण्यात येणार असून मैदानी व लेखी परीक्षेची तयारी करुन घेण्यात येणार आहे. सैन्य व पोलीस भरतीबदल मार्गदर्शन व शिबीरासाठी निवड करण्यासाठी मेस्को अकॅडमीचे प्रतिनिधी येथील सैनिकी मुलांचे वसतीगृहृ खाजानगर, धाराशिव मंदिरासमोर, उस्मानाबाद येथे 10 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता उपस्थित राहून शिबीरार्थींची निवड करणार आहेत. अधिक माहितीसाठी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वा.वेळेत मोबाईल क्रमांक-7588624043 किंवा 9420697807 वर संपर्क साधावा व महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मेस्कोच्या http://mescoltd.co.in/pages/mcasataraAbout.Aspx या संकेतस्थळासही भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
 
Top