उस्मानाबाद - जिल्हा उद्योग केंद्र, लघु उद्योग भारती आणि रोटरी क्लब उस्मानाबाद यांच्या वतीने जिल्ह्यातील उद्योजकांसाठी येत्या 4 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 2-30 वाजेपर्यत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.  जिल्हाधिकारी तथा उद्योग उपायुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उदघाटन होणार असून उद्योग सहसंचालक प्रविण देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. येथील हॉटेल मेघमल्हार हॉल येथे ही कार्यशाळा होणार आहे.
या कार्यशाळेत उद्योगांना अग्रक्रमाने अर्थसाह्य, नाबार्डच्या योजना, क्रेडिट रेटींग, अग्निशमनविषयक मार्गदर्शन, प्रदूषण विषयक नियम, उद्योगांना भूखंड वाटप व पायाभूत सुविधा, उद्योगांना वीजपुरवठा धोरण  व सवलती, नवीन औद्योगिक धोरण  व क्लस्टर योजना या विषयावर मार्गदर्शन होणार आहे.
या कार्यशाळेस जिल्ह्यातील उद्योजकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक पी.डी. हणबर, लघुउद्योग भारतीचे अध्यक्ष प्रवीण काळे, सचिव सुनील गर्जे आणि रोटरी क्लबचे अध्यक्ष नितीन तावडे यांनी केले आहे.
अग्रणी बॅंक व्यवस्थापक  बी. आर. दुपारगुडे, नाबार्डचे सहायक महाव्यवस्थापक सी.डी. देशपांडे, विकास अधिकारी शफीक शेख, विभागीय अग्निशमन अधिकारी आर.बी. पाटील, उपप्रादेशिक अधिकारी आर.ए. राजपूत, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता ए.के. देशमुख, महावितरणचे अधीक्षक अभियंता ए.बी.पापडकर आणि उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक  श्री. हणभर हे या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत.      
 
Top