बार्शी -   ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय ज्युनियर वुशू स्पर्धेत बार्शीतील शिवाजी महाविद्यालयाचा विद्यार्थी आकाश भोसले यास बेस्ट फायटर हा सन्मान देऊन गौरविण्यात आले. जवाहरलाल क्रीडा संकुल यवतमाळ येथे १२ ते १५ डिसेंबर दरम्यान या स्पर्धा पार
पडल्या. राज्यभरातून मोठ्या संख्येने उपस्थित स्पर्धकांपैकी ५२ किलो वजनी गटातून आकाश भोसले यास सुवर्णपदक, ६० किलो गटातून पंकज अंधारे यास रौप्य, ८० किलो गटातून अभिजीत तांबे यास कांस्य पदक मिळाले. मुलींच्या संघातून ४५ किलो गटातून अमृता सावळे हिस कांस्य पदक, ४८ किलो गटातून तेजस्विनी आगलावे हिस रौप्य पदक, ५६ किलो गटातून पूनम शिलोमणी हिस रौप्य पदक मिळाले. तृप्ती वसेकर, सुप्रिया जाधव, स्वप्नाली घोरपडे, अनिता कांबळे, राहुल जाधव यांनी प्रात्यक्षीके दाखविली. क्रीडा शिक्षक फुलचंद जावळे, संजय पाटील, प्रदिप हागरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे प्राचार्य मधुकर फरताडे, दत्तात्रय जाधवर व शिक्षकांनी अभिनंदन केले.
 
Top