पांगरी (गणेश गोडसे) दिरानेच वहिनींचा विनयभंग करून धमकी दिल्याची घटना उंबरगे ता.बार्शी येथे घडली.रमेश शिवाजी पाटील  असे विवाहितेचा विनयभंग करून धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नांव आहे.
      सत्तावीस वर्षीय विवाहितेने पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्या सायंकाळी सहा वाजता नौकरी वरुण घरी परत येऊन घराचे कुलूप उघडून घरात जात असताना आरोपी पाटील याने तेथे दारू पिऊन येऊन फिर्यादिस तू बाहेरच्या लोकासोबत बोलतेस माझे बरोबर का बोलत नाहीस असे म्हणून तिच्या क्ंबरेला मिठी मारून घरात आत ढकळून नेऊन तिच्या अंगाशी झोंबाझोंबी केली.तसेच फिर्‍यादीच्या कानावर बुक्की मारून मी तुला आत्ता सोडले पुन्हा सोडणार नाही असे म्हणून शिवीगाळ करत धमकी दिली.पांगरी पोलिसात पीडितेच्या फिर्‍यादिवरून गुन्हा दाखल झाला आहे.अधिक तपास हवालदार सुधाकर ठाकर हे करत आहेत.
 
Top