वैराग (महेश पन्‍हाळे)  जगद्गुरू श्री संत तुकोबाराय साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा नवोदित साहित्य पुरस्कार वैरागचे इतिहास अभ्यासक विष्णू तुपे यांना परिषदेच्या प्रदेशाध्
      जगद्गुरू श्री संत तुकोबाराय साहित्य परिषदेच्या वतीने नवोदित साहित्याकांना सन्मानपत्र देवून दरवर्षी सन्मानित करण्यात येते .परिवर्तनाच्या उद्देशाने सद्द्स्थितीतील परिस्थितीला सामोरे जात लेखणी व्दारे व्यक्त केलेल्या विशेष योगदानाबद्दल नवोदित साहित्यिक पुरस्काराने विष्णू तुपे यांना सन्मानपत्र देवून पंढरपूर येथे गौरविण्यात आले  .यावेळी परिषदेचे राज्य सचिव दत्ता भोसले ,प्रवक्ते नितीन सावंत ,जिल्हाध्यक्ष राहुल निळे ,कार्याध्यक्ष रंगनाथ काकडे आदी मान्यवर उपस्थित होते .तुपे यांना मिळालेल्या या पुरस्कार बद्दल वैरागसह वैराग भागातील असंख्य मित्र परिवारांनी शुभेच्छाचा वर्षाव केला .
याक्षा डॉ .निर्मला पाटील याच्या हस्ते प्रदान करण्यात आला.         
 
Top