पांगरी( गणेश गोडसे)  समाजातील प्रत्येक नागरिकाला आपल्या मनाप्रमाणे जीवन जगण्याचा घटनेने अधिकार देऊ केलेला असून त्‍यादृष्‍टीने नागरिकांच्या हक्काचे रक्षण व्हावे या हेतूने प्रत्येक वर्षी 10 डिसेंबर रोजी जागतिक मानवी हक्क दिन साजरा करून या दिनाचे महत्व अबाधित ठेवण्याचा प्रयत्‍न जागतिक पातळीवरून केला जात आहे.
             यावर्षी 66 वा जागतिक मानवी हक्क दिन साजरा होत आहे. 1948 पासून 10 डिसेंबर हा दिवस मानवी हक्क दिन म्हणून पाळण्यात येऊ लागला. पूर्वीच्या काळात राजघराने शाहीकडून प्रजेचा छळ करून त्यांना त्रास देऊन त्यांच्या हक्कावर गदा आणली जायची.तेव्हा होणारा अन्याय दूर करण्यासाठी मानवांच्या हक्काची पहिली सनद तयार करण्यात आली. समाजात जात,पात,धर्म,वंश,गोत्र,वर्ण भेद आदि अनेक कारणावरून भेदभाव होऊ नये व या समाज हितविरोधी गोस्टीचे समूळ उच्चाटन व्हावे यासाठी शासकीय प्रशासकीय पातळीवर शर्थीचे प्रयत्न होत असले तरी आजही मानवी हक्काची कायद्यासमोर पायमल्ली होताना उघड्या डोळ्यांनी पहाणे भाग पडत आहे. मानवाला बहाल करण्यात आलेल्या हक्काची पायमल्ली होण्याच्या प्रकाराला प्रतिबंध होऊन त्यांनाही समाजातील एक घटक म्हणून मान,सन्मानाने जागता यावे यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची खरी गरज आहे.1948 साली मानवी हक्क दिन अमलात आला असला तरी 1993 साली भारताने मानवी हक्क संरक्षण कायदा अमलात आणून याची खर्‍या अर्थाने सुरुवात केली असे म्हणावे लागेल.स्वसंरक्षण,जीवन,गुलामगिरीतून मुक्क्तता,संचार,भाषण,वैचारिक व धार्मिक,कोर्ट,कचेरी,नैसर्गिक हक्क,आदर्श जीवन जगण्याचा हक्क,सामाजिक हक्क आदि विविध हक्क घटनेने,समाजाने  मानवाला निसर्ग: दिले आहेत.मात्र या हक्काचा मानासाच्या जीवनात उपयोग होतो का याच्याही खोलात जाण्याची नितांत गरज आहे.
   मानवांच्या हक्काच्या रक्षणासाठी आज वेगवेगळ्या समाजात वेगवेगळ्या संघटणा अस्तीतत्वात आलेल्या आहेत.मात्र या संघटणा मानवाच्या हक्कासाठी खरोखरच झगडतात का हाही या दिवशी महत्वाचा विषय आहे.प्रत्येक क्षेत्रात आमच्या हक्कावर गदा येतेय असे गाळा काढून ओरडणारे खूप आहेत.माणूस आपल्या आपल्याच वर्तुळात गुंतत आहे.त्याला संपूर्ण समाजातील सर्व जातीय मानवाच्या हक्काशी कांही देणे घेणेच राहिले नसल्यासारखे वागलं जावू लागलाय.
  किमान मानवी हक्काच्या दिवशी तरी समाजधुरिणाणी विचार करून समाजातील मानसांच्या गरजा ओळखून कोणाच्याही नैसर्गिक हक्कावर कोणी गदा आणणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.सर्वच पातळ्यांवर होणारी मानवाची पिळवणूक,मुसकटदाबी, हीन वागणूक, यासह जुनाट रूढी,प्रथा थांबल्यास खर्‍या अर्थाने या दिनाचे सार्थक झाले असे म्हणता येईल.
 
Top