उस्मानाबाद -  जिल्हा हिवताप कार्यालयातर्फे व स्वयंसेवी संस्थेमार्फत जिल्हयात हत्तीरोग दुरीकरणासाठी एक दिवसीय सामुदायीक औषधोपचार मोहिम  दि. 14 ते 18 डिसेंबर या कालावधीत राबविण्यात  येणार आहे. दि. 14 ते 16 डिसेंबर या तीन दिवसात ग्रामीण भागात तर शहरी भागात 14 ते 18 डिसेंबर हे 5 दिवस हत्तीरोग प्रतिबंधक डीईसी गोळया खाऊ  घालण्याचा एक दिवसीय सामुदायीक औषधोपचार मोहिमेत सर्वांना डी ई सी व अल्बेडझॉल गोळ्याचे सेवन करुन हत्तीरोग दुरीकरण मोहिम यशस्वी  करावी, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.
    या कालावधीत आरोग्य कर्मचारी व स्वयंसेवक घरोघरी जावून 2 वर्षाखालील बालके, गरोदरमाता व गंभीर आजारी रुग्ण वगळून इतर सर्व नागरिकांना या गोळ्यांचे वाटप करणार आहेत. नागरिकांनी त्यांच्या घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसमक्ष या गोळ्यांचे सेवन कराव्यात, असे आवाहनही जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत करण्यात आले आहे.  ही मोहीम संपूर्ण जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यासाठी जिल्हा हिवताप यंत्रणा आणि आरोग्य विभागाची संपूर्ण तयारी झाली असून संबंधित गोळ्यांचे सध्या गावपातळीवरील आरोग्य कर्मचाऱ्यांना वितरण करण्यात येत असून त्यांच्यामार्फत दि. 14 पासून वाटप करण्यास सुरुवात होणार आहे.   
 
Top