उस्मानाबाद - हुंदका माझा तसा बंदिस्त आहेआसवांना लावलेली शिस्त आहेराहिला नाही भरवसा पावसाचाआसवांवरती पिकांची भीस्त आहेनापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकर्‍यांवर ओढावलेला संकटाचा डोंगर, अशा पध्दतीच्या ओळींमधून गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी रसिकांसमोर व्यक्त करीत उस्मानाबादकरांच्या काळजाला हात घातला. निमित्त होते उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघ आणि व्हॉट्‌सऍप ग्रुपच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या गझल मैफिलीचे. हिवाळ्यातील थंड हवा, वाफाळलेल्या चहाचा आस्वाद आणि कधी मनाला तर कधी मेंदूला हलवून सोडणार्‍या एकाहून एक सरस गझल, असा निर्भेळ आनंद उस्मानाबादकरांनी अनुभवला. पत्रकार संघाच्यावतीने शहरातील जिल्हा परिषद प्रशालेच्या प्रांगणात गुरुवारी रात्री गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. हिंदी, मराठी आणि भाषा भगिनींचा संयोग असलेली को-ऑपरेटीव्ह गझल, असा अफलातून प्रयोगही पांचाळे यांनी सादर करीत रसिक श्रोत्यांना खेळवून ठेवले. होईल हँग हो हॅन्डसेट काळजाचाभरला तिच्या स्मृतिंनी इनबॉक्स काळजाचा शा नवीन प्रतिमा घेवून आलेल्या भावकळाही रसिकांना मंत्रमुग्ध करून गेल्या. नसीम जाफर यांची ‘ठंडी हवा के झोके चलते है हलके हलके’ ही गझल भाव खावून गेली. या गझलेतील क्या शहर है तुम्हारा, बहरूपीयों की नगरी मिलते है लोग अक्सर, चेहरे बदल बदलके  शेर उपस्थित श्रोत्यांची खास दाद मिळवून गेला. चाहनेवाले चंद मिलते है हजारो दर्दमंद मिलते है वक्त आता है जब मुसीबत का सारे दरवाजे बंद मिलते हैया रूबाईला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. मराठी गझलेसोबतच हिंदी आणि भाषिक एकोपा प्रतिकात्मक पध्दतीने व्यक्त करणारी मराठी-हिंदी अशी दीपक अंगेवार आणि राजू कदम या दोन गझलकारांनी मिळून लिहिलेली को-ऑपरेटीव्ह गझलही रसिकांना आनंद देवून गेली. ऐ सनम आँखो को मेरी खुबसुरत साज दे येऊनी स्वप्नात माझ्या, एकदा आवाज देऐ खुदा इन्सान को इन्सानियत पहले सिखाभावना दे तू तयाला आणि थोडी लाज  कधी मिश्कील, कधी मनोरंजक तर कधी लडीबाळ भाव व्यक्त करीत पांचाळे यांनी हजारो श्रोत्यांच्या काळजाचा ठोका चुकेल, अशा अनेक रचना यावेळी सादर केल्या. है अंधेरी रात फिर भी, रोशनी की बात कर
लावण्या तू दीप येथे काळजाची वात कर असा आत्मविश्‍वास निर्माण करणारे भावनिक आंदोलनही अंगेवार यांच्या या गझलच्या माध्यमातून हजारो रसिकांच्या हवाली केले. शेवटी अंतरी माझ्या जरी आकांत आहेचेहरा माझा तरी ही शांत आहेअक्षरांचा खेळ नाही गझल माझीजीवनाचा हा खरा वृत्तांत आहे शा सूचक शब्दांत गझलची व्याख्या नमूद करीत ए. के. शेख यांच्या गझलेने मैफिलीचा समारोप केला.
गरीबाच्या लग्नाला नवरी गोरी काय अन् काळी काय
महागाईने पिचलेल्यांना होळी काय अन् दिवाळी काय
रक्त लाल आहे सर्वांचे कशास मग ही भेद भावना
सगळ्यांना मातीतच जाणे कुणबी काय अन् माळी काय
 
Top