उस्मानाबाद -  इंदिरा आवास योजनेअंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यास 2014-2015 वर्षासाठी शासनाने ठरवून दिलेल्या उद्दिष्टानुसार घरकुलाचे बांधकाम करुन उस्मानाबाद जिल्हा मराठवाडा विभागात प्रथम तर राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यकारी समितीच्या अध्यक्ष सुमन रावत यांनी ही माहिती दिली आहे.
    इंदिरा आवास योजनेंतर्गत वर्ष 2014-15 साठी 2116 घरकुलांच्या कामास प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. यापैकी जिल्हयातील 1 हजार 681 लाभार्थ्यांस पहिला हप्ता, 599 लाभधारकास दुसरा हप्ता वितरीत करण्यात आला. 95  घरकुलांचे कामे पूर्ण असून त्याचे अंतिमीकरण करण्यात आले आहे. सन 2013-14 मध्येही  जिल्ह्याने 98 टक्के घरकुलांची कामे पूर्ण केली आहेत.
इंदिरा आवास योजनाअंतर्गत लिंटल लेवलपर्यंत काम पूर्ण करुन दुसऱ्या हप्त्याची पंचायत समिती स्तरावर तातडीने मागणी नोंदवून निधी वेळेत खर्च करावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रावत यांनी केले आहे.   
 
Top