नळदुर्ग - महाविद्यालयात शिक्षण घेणा-या विद्यार्थीनींची रोडरोमियोकडुन छेडछाड होत असुन त्‍याचा बदोबस्‍त करण्‍याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नळदुर्ग शाखेच्‍यावतीने सहाय्यक पोलिस निरीक्षक यांच्‍याकडे लेखी केली आहे.   
नळदुर्ग येथिल  कला विज्ञान व वाणिज्‍य महाविद्यालय ,अध्‍यापक महाविद्यालय येथे शिक्षण घेण्‍यासाठी आसपासचे खेडयापाडयातील जवळपास हजारो विद्यार्थीनी शिक्षणासाठी बसने ये जा करतात. कॉलेज सुटल्‍यानंतर महाविद्यालयापासून बसस्‍थानकापर्यंत पायी ये- जा करावे लागते. तसेच बसची वाट पहात महाविद्यालयासमोरील बसथाब्‍यावर  थांबावे लागते. नळदुर्ग बसस्‍थानकात  काही टवाळखोर मुले मुलींच्‍या शेजारी बसुन सदर मुलींचे मोबाईल मध्‍ये फोटो काढणे, मोबाईलवर अश्‍लील गाणे वाजवणे, टॉंट मारणे, मोटारसायकलवरून कट मारणे, सतत मुलींकडे पाहत राहणे, बसमधील गर्दीचा फायदाघेत बसमध्‍ये चढताना व उतरताना धक्‍काबुक्‍की करणे, त्‍याचा नाहकच  त्रास सहन करावा लागतो. याप्रकरणी मुलीं व त्‍यांच्‍या पालकांची तोंडी तक्रारी  मोठया प्रमाणावर होत आहे. यातील काही मुले हे महाविद्यालयात शिक्षण घेत नसुन व कोठे परगावी जात येत नाहीत विनाकारण दिवसभर बसस्‍थानकात थांबुन वरील प्रकार करत असल्‍याचे निवेदनात नमुद करून    तरी सदर रोड रोमियोंचा बंदोबस्‍त करण्‍यासाठी सकाळी साडे आठ ते आकरा व दुपारी दोन ते पाच या वेळेत बसस्‍थानकात दोन पुरूष व दोन महिला पोलिस कर्मचारी यांची नियुक्‍ती करावी व बालाघाट कॉलेज ते बसस्‍थानकापर्यंत पोलिसांची गस्‍त ठेवण्‍याची मागणी केली . निवेदनाची प्रत जिल्‍हाधिकारी , पोलिस अधिक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी, महिला छेडछाड विरोधी पथक, संबधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांना पाठविण्‍यात आले आहे

 
Top