उस्मानाबाद -  मानवनिर्मित आपत्ती व नैसर्गिक आपत्ती असे दोन प्रकारची आपत्ती केव्हाही येऊ शकते. या आपत्तीचा सक्षमपणे मुकाबला करण्याची प्रत्येकांना आपत्तीविषयक प्रशिक्षणांची गरज आहे. ज्यामुळे अपघात काळात झालेल्या व्यक्तींना कमी  इजा होईल. यासाठी सर्वांच्चा प्रयत्नांची गरज आहे. यासाठी आपत्ती काळात प्रत्येकांनी पुढाकार घेणेसाठी मानसिकता बदलण्याचे आवाहन अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील यांनी  केले.
               येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात उस्मानाबाद जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या वतीने महाराष्ट्र आपत्ती धोके व व्यवस्थापन कार्यक्रम या विषयक दोन दिवशीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. याप्रंसगी उदघाटन करतांना श्री.पाटील यांनी वरील प्रतिपादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे, पुणे येथील एनडीआरएफचे आर.आर.लष्कर, आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या श्रीमती वृषाली तेलोरे यांची उपस्थित होते.
                श्री.पाटील म्हणाले की, आपत्तीच्या काळात नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी. त्यायोगे नागरिकांनी आपल्या परिसरात झालेल्या आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी वेळेचा सदपयोग करुन उपलब्ध साधन सामग्रीचा वापर करुन पुढाकार घेऊन या परिस्थितीवर मात करण्याचे आवाहन त्यांनी केले. आपत्ती काळात  मदत करण्याचे धोरण स्विकारावे. या प्रशिक्षणातून आपत्ती काळात कोणत्या साधनांचा वापर करता येईल, अति जलद गतीने निर्णय घेऊन परिस्थिती  कशी हाताळता येईल, याचे ज्ञान घेऊन जनजागृती करावी, असेही आवाहन त्यांनी केले.
               प्रत्येक वेळी आपत्तीच्या काळात वेगवेगळया बाबी लक्षात येत असतात त्यावर तात्काळ निर्णय घेऊन कमी धोके कसे होतील, याची कला आत्मसात करावी. आपत्ती काळातील परिस्थिती हाताळतांना किमान प्राथमिक ज्ञानाची गरज आहे. त्यामुळे रुग्णांना कमी इजा होईल. हे प्रशिक्षण आपल्यासाठी  होणार असल्याने तज्ञांकडून केलेल्या मार्गदर्शनांचा उपयोग आपत्ती काळात करावा. कोणतेही आपत्ती आली तर ही परिस्थिती हाताळण्याची ताकद आपल्यामध्ये यावी, यासाठी या प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात आले असल्याचे मत  श्रीरंग तांबे यांनी व्यक्त केले.
        श्रीमती तेलोरे म्हणाल्या की, या दोन दिवशीय प्रशिक्षणास पुणे येथील राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकांना (एनडीआरएफ) यांना पाचारण करण्यात आले आहे. या पथकांतील तज्ञाकडून आपत्ती काळात परिस्थिती कशी हाताळावी याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील विविध भागात यांचे प्रत्यक्षिकेही दाखविण्यात येणार आहेत. आपत्ती काळात नागरिक व पथकांनी घ्यावयाची दक्षता याबाबत माहिती प्रस्ताविकात दिली.
           यावेळी एनडीआरएफ च्यावतीने श्री.सुनिल तिवारी आणि महेश कुमार यांनी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे काम हे माहिती मिळताच भुकंप, सुनामी, केमीकल एर्मजर्न्सी, रिडॉजीकल एर्मजन्सी अशा विविध आपत्तीच्या काळात परिस्थितीवर मात करण्यासाठी ही बटालियन सदैव तयार असते . त्यामुळे आपल्या भागातील आलेल्या आपत्तीच्या काळात आपण काय केले पाहिजे काय करु नये याबाबत सादरीकरणाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.         
           राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक, पुणे यांच्याकडून  प्रत्याक्षिक व प्रशिक्षणाचे आयोजन खालील नमूद तारखेस करण्यात आले आहे, जिल्ह्यातील आपत्ती धोके व्यवस्थापन कार्यक्रमात दि.10 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 12 या काळात विद्यामाता हायस्कूल,उस्मानाबाद, त्याच दिवशी तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयात तलाठी मंडळ अधिकारी व ग्रामसेवक यांच्यासाठी पंचायत समिती कार्यालय, उमरगा येथे दुपारी 3 वाजता,  दि.11 रोजी सकाळी 10-30 ते दु.12 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी कार्यालय, बैठक सभागृहात, दि.11 रोजी दुपारी 1 ते  दु.4  या काळात जिल्हा सत्र न्यायालय येथे सर्व कर्मचारी व बार कौन्सील सदस्य यांच्यासाठी जिल्हा सत्र न्यायालय  बैठक सभागृह, उस्मानाबाद येथे, दि. 12 रोजी तुळजाभवानी स्टेडीयम, उस्मानाबाद येथे सकाळी 9 ते 10-30 या काळात जिल्ह्यातील सर्व कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी तसेच रहिवाशी यांच्यासाठी प्रात्यक्षीकांचे आयोजन, दि.12 रोजी भारत विद्यालय व भारत कनिष्ठ महाविद्यालय, माकणी ता. लोहारा येथे दुपारी 2 ते 4 या वेळेत सर्व शिक्षक व विद्यार्थी यांच्यासाठी तर श्री माधवराव पाटील महाविद्यालय, मुरुम ता. उमरगा येथे दि.13 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते 2 पर्यंत सर्व शिक्षकांसाठी  या प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात आल्याची माहितीही श्रीमती तेलोरे यांनी दिली.
           या प्रशिक्षणास  पोलीस व सर्व तालुक्यातील  अग्निक्षमन दलाचे अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती. 
 
Top