उस्मानाबाद -  आकाशवाणी उस्मानाबाद केंद्राच्या 18 व्या वर्धापन दिनानिमित्त आज जिल्हा परिषदेच्या यशवंतराव सभागृहात युवा सांस्कृतिक महोत्सव युवास्पंदन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाचे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष  कुलदीप पाटील हे होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय बरीते, अभियांत्रिकी प्रमुख तानाजी शिनगारे, प्रसारण अधिकारी कृष्णा शिंदे यांची व्यासपीठवर उपस्थिती होती.
    डॉ.नारनवरे म्हणाले की, आकाशवाणी परिवारामार्फत जिल्हातील विविध प्रश्न रसिकांपर्यत पोहचविण्याचे व लोकप्रबोधन करण्याचे महत्वाचे कार्य केले जाते. आकाशवाणी केंद्रानी जिल्ह्यात विविध उपक्रम राबवून श्रोत्यांना जागृत करण्याचे कार्यही केले जाते. आकाशवाणी केद्रांने सर्व रसिकांची मने जिंकल्याने ही बाब कौतूकास्पद असल्याचेही त्यांनी सांगून महोसत्वात सहभागी युवकांना शुभेच्छा दिल्या.
    श्री. पाटील यावेळी म्हणाले की, आकाशवाणी कडून शेतकरी व श्रोत्यांसाठी गणुदर्शन, युवा दर्शन,  किसान दर्शन यासारखे कार्यक्रम राबवून जनप्रबोधनाचा कार्य केले जाते. त्यांच्या या उत्कृष्ठ कार्याबद्दल त्यांचे कौतूक करुन सर्व कलाकारांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांनीही युवा सांस्कृतिक महोत्सव आयोजित केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.
    श्री.बरीते म्हणाले की, हा युवा महोत्सव सर्वांच्या साक्षीने साजरा होत आहे. या आकाशवाणी केंद्राला दोन राज्यस्तरावरील पुरस्कार प्राप्त झाले आहेत. रसिकांच्या मदतीने आकाशवाणी ही चळवळ व्हावी, यासाठी  कलावंत प्रयत्न करत आहोत, यामध्ये युवा कलांवतांनी भर भरुन प्रतिसाद दयावा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
आकाशवाणी उस्मानाबाद यांनी युवकांसाठी सादर केलेले युवा सांस्कृतिक महोत्सव पहाण्यासाठी  रसिक श्रोते यांची गर्दी झाली होती.
या युवा सांस्कृतिक महोत्सवात उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांनी युवक –युवती सहभागी झाल्या होत्या. सर्वांना कार्यक्रम पहाण्यास उत्सूकता वाढत होत असतानाच आकाशवाणी परिवारातर्फे समुहस्वरात जयोस्तुते, स्वरधारा संगीत विद्यालयाचे निनाद समुद्रे यांनी गी-कुणी जाल का, संवाद समुद्रे यांनी गी- हे सुरांनो चंद्र, अक्षय भन्साळी यांनी गी-सावली उन्हातली, आकाश पाटील यांनी  अमृताहुनी गोड –भक्तीगीत, व्यंकटेश महाजन महाविद्यालयातील अमोल बोंदर यांनी भजन गायीले, सुजीत सुखवंत उपासे –वासूदेव,समुह नृत्यामध्ये वाघ्या मुरळी, पुजा देडे यांनी पोवाडा, लोकनृत्य यामध्ये येडाबाई निघाली पाण्याला, रा.प. महाविद्यालयातील अश्विनी मालखरे यांनी लावणी, मुकअभिनय, तालवाद्य,विनोदी अभिनय, खेळ मांडला या गाण्यात रंगराज पुराणिक यांनी गायन करून मंत्रमुग्ध केले. यावेळी विजया भारज रणदिवे यांनी कोळी नृत्य, व्यंकटेश महाजन महाविद्यालयातील युवकांनी  लोकगीत सादर केली तर विभावरी पाटील यांनी लल्लाटी भंडार या  लोकनृत्यांचे सादरीकरण करुन सर्व रसिकांची मने जिंकली. यावेळी विविध लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी,कर्मचारी युवा रसिक मोठया संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी भारतीय सीमेवरील शहीद जवान तसेच दुदैवी परिस्थितीमुळे स्वत:चा जीव गमावेलेल्या शेतकऱ्यांप्रती 1 मीनीट मौन पाळून उपस्थितीमार्फत श्रध्दांजली अर्पण केली. या महोत्सवाचे सूत्रसंचालन संजय मैदर्गी यांनी केले आभार कृष्णा शिंदे यांनी मानले.
 
Top