बार्शी(मल्लिकार्जुन धारूरकर) बार्शी नगरपरिषदेस १५० वर्ष पूर्ण होत असल्याने यंदाचे वर्ष हे शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. यावर्षी विविध विशेष उपक्रमांद्वारे अधिक लोकोपयोगी कामांची पूर्ती करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष रमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी गटनेते नागेश अक्कलकोटे, मुख्याधिकारी दत्तात्रय लांघी, उपनगराध्यक्षा अरुणा परांजपे, नगरसेविका रिझवाना शेख, संगीता मेनकुदळे, निर्मला स्वामी आदी उपस्थित होते.
आमदार दिलीप सोपल यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ग्रीन सिटी क्लिन सीटी, पुतळा पार्क, डिजीटल उपविधी, शहरातील प्रमुख ठिकाणी सी.सी.टीव्ही कॅमेरा उभारणी घर तेथे पाणीपुरवठा व शौचालय योजना, तर जागेची उपलब्धता नसलेल्या काही ठिकाणी सार्वजनिक सुलभ शौचालय, सातत्यपूर्ण स्वच्छता, पर्यावरणपूरक वृक्ष लागवड, सामाजिक संस्था शासकिय संस्था, महाविद्यालयांच्या सहभागातून वर्षभर विविध कार्यक्रम यासारख्या विशेष उपक्रमांचे आयोजन केले आहे.
शहरातील अनेक घरांना पाणी पुरवठा अधिकृत कनेक्शन तर काही ठिकाणी बेकायदा वापर होता, शहरातील पाणी पुरवठ्याच्या कनेक्शनचा सर्वे करुन अनाधिकृत वापरकर्त्यांची यादी तयार करण्यात आली त्यांच्याकडून ठरवून दिल्याप्रमाणे दंडाची आकारणी करुन त्यांना वापर परवाना नियमित करण्यात येणार आहे. तर ज्यांनी अद्याप नळजोड घेतला तसेल त्यांना मागेल त्यांना विना अनामत रक्कम परंतु आवश्यक साहित्य लाभधारकांकडून या पध्दतीने नळ जोड देण्यात येत आहे. एहराची १५० वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेला गौरव ग्रंथ, विविध क्रीडा, कला, मनोरंजनपर उपक्रमांचे आयोजन करुन लोकोपयोगी उपक्रमांद्वारे विकास कामांची पूर्ती करण्यात येईल असेही यावेळी सांगण्यात आले.

 
Top