पांगरी: (गणेश गोडसे) शेतीचे अनुदानाचे पैसे देण्याच्या कारणावरून एका भावाने  दुसर्‍या भावाला काठी व लाथाबुक्यांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना शनिवारी दि.3 रात्री कारी ता.बार्शी येथे घडली.अनिल सुखदेव बनसोडे,सुलण बनसोडे अशी मारहाणीत जखमी झालेल्यांची नांवे असून सुरेश सुखदेव बनसोडे,विठ्ल सुरेश बनसोडे अशी काठीने मारहान करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची नांवे आहेत.
   अनिल बनसोडे यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की आरोपी सुरेश याने त्यांच्या घरासमोर येऊन तुम्ही मला शेताच्या अनुदानाचे पैसे का दिले नाहीत असे म्हणून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली असता त्यांची पत्नी सुलण यांनी तेथे येऊन शिवीगाळ करू नका असे म्हणाली.याचा राग मनात धरून तू कोण मला सांगणार असे म्हणत अनिल बनसोडे व सुलण यांना सुरेश याने हातातील काठीने डोक्यात,हातावर मारून जखमी केले.दरम्यान फिर्‍यादीचा मुलगा भाडणे सोडवण्यास आला असता त्यालाही आरोपीचा मुलगा श्री.विठल याने लाठा बुक्क्याने मारून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.अनिल बनसोडे यांच्या फिर्यादिवरून आज रविवारी दोघाविरुद्ध मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पांगरी पोलिस करत आहेत.

 
Top