उस्मानाबाद - जिल्ह्यातील पोलीस उपनिरीक्षक व त्यापेक्षा वरिष्ठ अधिका-यांना जिल्हा पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे  यांनी पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 प्रमाणे जिल्ह्यातील सर्व पोलीस उपनिरीक्षक व त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांना  दि. 3  ते 5 जानेवारी 2015 च्या मध्यरात्री  या कालावधीत नियमनात्मक अधिकार बहाल केले आहेत. 
उत्सव जिल्ह्यात शांततेन पार पडावेत मिरवणूकी दरम्यान वाहतूकीचे नियंत्रण व नियमन करता यावे, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, म्हणून हे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार ते अधिकारी मिरवणूकीला अथवा जमावाला आवश्यक ते निर्देश देवू शकतील  व त्याचे पालन करणे बंधनकारक असेल.

 
Top