उस्मानाबाद - क्रीडा  व युवक सेवा संचालनालय,पुणे  व जिल्हा क्रीडा कार्यालय, उस्मानाबादच्या संयुक्त विद्यमाने येत्या 12 ते 19 जानेवारी या कालावधीत राष्ट्रीय युवादिन व युवा सप्ताह साजरा करण्यात येणार असून या सप्ताहात विविध कार्यक्रम आयोजित  येणार आल्याची  माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी, उस्मानाबाद यांनी दिली.
   12 जानेवारी,2015 रोजी सकाळी 9-30 स्वामी विवेकानंद जन्मदिनानिमीत्त  रामकृष्ण परमहंस मविद्यालय, उस्मानाबाद येथे राष्ट्रीय युवादिन युवा सप्ताहाचे  उदघाटन/ भाषण, 13 रोजी स. 11 वाजता सैनिकी शाळा, तुळजापूर येथे सूर्यनमस्कार व योगासन स्पर्धा, 14 रोजी स. 11 श्री. रामानंद महाराज विद्यामंदीर, काजळा, ता.जि उस्माबाद येथे रक्तदान व नेत्रदान या विषयावर युवकांना मार्गदर्शन, 15 रोजी स. 11 वा आळणी येथील जीवनराव गोरे विदयालयात गीतगायन स्पर्धा, 16 रोजी श्रीकुलस्वामीनी विद्यालय, तुळजापूर येथे स. 11 वा.चित्रकला स्पर्धा, 17 रोजी स. 11 वा महाराष्ट्र संत विद्यालय तेर येथे देशात शांतता राखण्यात युवकांचे कर्तव्य या विषयावर चर्चासत्र, 18 रोजी स. 11 श्रीतुळजाभवानी जिल्हा स्टेडीयम येथे मैदानी खेळाबाबत  प्रशिक्षण व मार्गदर्शन आणि 19 जानेवारी  रोजी स्टेडीयम, उस्मानाबाद  येथे दु. 3 वा. युवादिन  युवा सप्ताहाचा समारोप व बक्षिस वितरणाचा कार्यक्रम आयोजिण्यात आला आहे.
इच्छुक क्रीडा मंडळे, युवक मंडळे, महिला मंडळे, युवक- युवतींनी यासप्ताहात सहभागी व्हावे, आपले प्रवेशिका जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय श्री. तुळजाभवानी जिल्हा स्टेडीयम, उस्मानाबाद येथे स्पर्धेपुर्वी दोन दिवस अगोदर कार्यालयीन वेळेत सादर करावे, असे आवाहन  करण्यात आले आहे.       
 
Top