पांगरी (गणेश गोडसे) :- शेतातील इलेक्ट्रिक मोटार सुरू करण्याच्या व पाईप टाकण्याच्या किरकोळ कारणावरून दोघांनी मिळून दोघांना कुर्‍हाड व काठीने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना महागाव (ता. बार्शी) येथे शेतात घडली.
प्रदीप भागवत चापले (वय 28), भागवत अर्जुन चापले (दोघेही रा.महागाव) अशी कुर्‍हाड व काठीहल्ल्यात जखमी झालेल्याची नावे असून फुलचंद नागनाथ घोलप व संतोष फुलचंद घोलप अशी मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
     जखमी प्रदीप चापले यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ते त्यांच्या ज्वारीच्या पिकात उभे असताना आरोपीं फुलचंद  घोलप व संतोष घोलप यांनी  तेथे येऊन तुम्ही इलेक्ट्रिक मोटार का चालू केली व आमच्या शेतात पाईप का टाकले असे म्हणून शिवीगाळ करत हातातील काठी व कुर्‍हाडीने त्यांच्यासह त्यांच्या वडिलांना डोकीत,हातावर ,पाठीवर मारून जखमी केले.प्रदीप चापले यांच्या फिर्‍यादिवरून दोघांवर पांगरी पोलिसात कुर्‍हाडीने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पांगरी पोलिस करत आहेत.

 
Top