उस्मानाबाद -  जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीतील रस्ते व पुलावरील बाजूस ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून वृक्ष लागवडीसाठी समिती गठीत करण्यात आली असून  कृषी व  सामाजीक वनीकरण विभागाच्या सहकार्यातून दिलेले  वृक्ष लागवडीचे उदिष्ट वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे यांनी दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील त्यांच्या दालनात आयोजित पंतप्रधान ग्रामीण रोजगार हमी योजना नियोजन व सनियंत्रण स्थापन  समितीचे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी वरील निर्देश दिले. या बैठकीस पंतप्रधान ग्रामीण रोजगार हमी योजनेचे कार्यकारी अभियंता  श्री.थोरात, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (नरेगा) श्री.चव्हाण, श्री.एच. आर. मुळे, श्रीमती जाधव यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकाऱ्‍यांची उपस्थिती होती. 
या बैठकीत सन 2014-15 व 2015-16 या वर्षासाठी वृक्ष लागवडीचे उदिष्ट, रस्ते व पुलाच्या बाजूस करावयाचे वृक्षलागवड, ग्रामपंचायतींना लागवडीसाठीचे उदिष्ट, बिहार पॅटर्नप्रमाणे झाडे संगोपनासाठी कुटूंबांची निवड करणे, कृषी व सामाजीक वनीकरण विभागाचे तांत्रीक सहकार्य घेणे, रस्त्यांच्या दुतर्फा बाजूस लागवड, आवश्यक असलेल्या रस्त्यांचे व पुलाच्या बाजूच्या जागेचे सर्वेक्षण आणि गुत्तेदारांकडून वृक्षलागवडीचे कामे तात्काळ करुन घेणे आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.  

 
Top