पांगरी (गणेश गोडसे) पोलिस ठाण्यात गुन्ह्याचे काम करत असलेल्या पोलिस अधिकार्‍यास शिवीगाळ,दमदाटी करून शासकीय कामात अडथळा केल्याची घटना काल मंगळवारी (दि.30) रात्री पांगरी ता.बार्शी येथील पोलिस ठाण्यात घडली.पोलिस उप-निरीक्षक श्री.राजू ग्यानबा राठोड  असे शिवीगाळ दमदाटी झालेल्या अधिकार्‍याचे नांव असून सोमनाथ संभाजी नारायनकर रा.पांगरी असे शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्याचे नांव आहे॰
  पोलिस उपनिरीक्षक श्री.राठोड यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्या


दीत म्हटले आहे की ते रात्री पोलिस ठाण्यात गुंहयाची नोंद घाट असताना नारायनकर याने तेथे येऊन शासकीय कामात अडथळा करत उपस्थित अधिकारी व कर्मचार्‍यांना शिवीगाळ दमदाटी केली.पांगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.अधिक तपास पांगरी पोलिस करत आहेत.

 
Top