वैराग (महेश पन्हाळे)  पोलीस प्रशासनाच्या वतीने २ जानेवारी ते ८ जानेवारी दरम्यात सुरक्षा सप्ताह सुरु करण्यात आला असून यादरम्यान सात दिवसात वैराग पोलीस स्टेशनच्या वतीने वि
विध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .त्याचाच एक भाग म्हणून वरिष्ठ नागरिक , स्त्रिया ,शालेय विद्यार्थी ,अल्पसंख्याक व सामाजिक दुर्बल घटकामध्ये सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी वैराग पोलीस प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येणारा “रेझिंग डे “ साजरा करण्यात आला .यावेळी वैराग मधील शालेय विद्यार्थ्यांना पोलीस यंत्रणेची माहिती देण्यात आली .
       सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित रेझिंग डे दिवशी येथील विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालय , सुवर्णलता गांधी महाविद्यालय , विद्यामंदिर कन्या प्रशाला आदी मधील विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले . यावेळी विद्यार्थ्यांना बंदुकीची माहिती देण्यात आली तसेच मुलींना कायदे व हक्क याची माहिती देण्यात आली .३ जानेवारी रोजी महिला दक्षता समिती स्थापन करून बैठकी व्दारे माहिती देण्यात आली . ४ जानेवारी रोजी विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ,५ जानेवारीला जनजागृतीसाठी महाविद्यालयांना भेटी देण्यात येणार आहेत .६ जानेवारी रोजी विविध घटकातील व समुदायातील लोकांमध्ये चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले असलायचे वैराग पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत शिंदे यांनी सांगितले .
      वैराग पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित रेझिंग डे साजरा करण्यासाठी सपोनि उमाकांत शिंदे ,पोलीस कर्मचारी गणेश हंचे ,माणिक जाधव ,अजित कदम ,दादाराव पवार ,शिरमा गोडसे आदी सह वैराग पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले 
 
Top