उस्मानाबाद :- 115 इन्फ्रंटी बटालीयन टी. ए. महार फोर्ट बेलगाव, (कर्नाटका)  येथे 21 ते 25 जानेवारी या दरम्यान सोल्जर जीडी, ट्रेडसमॅन या पदासाठी टी. ए. सैन्य भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या पदासाठी शैक्षणिक पात्रता सोल्जर जीडीसाठी 10 वी पास 45 टक्के मार्कस, ट्रेसमॅनसाठी 10 वी पास आवश्यक आहे.  इच्छुक आजी सैनिक/ माजी सैनिक विधवा/ युध्द विधवांच्या पाल्यांची रिलेशन प्रमाणपत्र संबधित रेकार्ड असल्यास भरती करण्यात येणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मेजर (नि) सुभाष सागणे जिल्हा सैनिक कल्याण  अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.
 
Top