पांगरी (गणेश गोडसे) जनतेच्या रेंगाळलेल्या  प्रश्नावर आवाज उठवल्यामुळे अनेक प्रलंबित विषय मार्गी लागत असल्यामुळे पत्रकार हा समाजाचा एक अविभाज्य घटक आहे असे प्रतिपादन पांगरीचे सरपंच विजय गोडसे यांनी केले.ते आज पांगरी ता.बार्शी येथे तंटामुक्तीचे पुरस्कर्ते किरण पवार यांच्यावतीने आयोजित दर्पण कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतिंनिमित्त  पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात पत्रकारांच्या सत्कार प्रसंगी बोलत होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री.जांभेकर व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.ज्येष्ठ पत्रकार तात्या बोधे,गणेश गोडसे,बाबा शिंदे,आबा घावटे,संजय बोकेफोडे,नवनाथ जगताप,अनिल खुने यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
    यावेळी अभियंता दिलीप शिंदे,माजी सरपंच जयंत पाटील,सतीश जाधव,राजाभाऊ पाटील,आयोजक किरण पवार,माणिक शिंदे,बाळासाहेब शिंदे,विकास पाटील,संदीप पाटील,बालाजी मुळे,कैमुद्दीन काजी,शिवाजी पवार,सचिन निंबाळकर,रवी काकडे,आदि मान्यवर उपस्थित होते.अहोरात्र समाजाच्या भल्यासाठी झटणारा व वाईट प्रथा, परंपरा,चाली यावर तुटून पढणार्‍या पत्रकारांचाही गौरव व्हावा त्यांचेही कौतुक व्हावे या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे संयोजक किरण पवार यांनी यावेळी प्रस्ताविकात सांगीतले.
  समाजाशी बांधिलकी ठेऊन विकासाच्या बाबतीत पाठपुरावा करून अन्यायावर तुटून पडू अशी ग्वाही पत्रकारांनी यावेळी सत्काराला उत्तर देताना दिली.या भागात जागृत पत्रकारांची फळी अजूनही शिल्लक असल्याची जाणीव वेळोवेळी समाजाला करून देऊ असेही संगितले.आभार संदीप पाटील यांनी मानले.

 
Top