बार्शी :- बेलगाव (ता.बार्शी) येथील क्रांती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या योगासन शिबीरात जिल्हा परिषदेच्या विद्यार्थी व ग्रामस्थांनी सहभाग घेतला. या शिबीरार्थींना योगगुरु अनिल वेदपाठक यांनी मार्गदर्शन केले.
जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात हे शिबीर यशस्वीपणे पार पडले. यावेळी मुख्याध्यापक शिवाजी कांदे, धीरज शेळके, हनुमंत शेळके, आगतराव शेळके, किशोर तावरे, शिवाजी शेळके, प्रमोद साळुंखे, विनोद पवार, समाधान महिंगडे, भगवान शेळके, चंद्रकांत शेळके, सचिन शेळके, कालिदास शेळके, लक्ष्मण शेळके यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व श्रीफळ फोडून करण्यात आले. 
 
Top