बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) :- येथील जय शिवराय प्रतिष्ठाणच्या वतीने मॉसाहेब जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंतीनिमीत्त गरजू महीलांना साडीचे वाटप तसेच कामगारांना अल्पोपहार वाटप करण्यात आला.
सक्षम स्त्री, सक्षम महीला, महीलांवरील अत्याचार रोखणे,चांगला समाज घडवीणे यासाठी जिजाऊ जयंती साजरी करुन मुख्य व स्वयंप्रकाशीत कॅलेंडरवर मॉसाहेब जिजाऊंच्या जन्मोत्सवाचा उल्लेख असलाच पाहिजे. उल्लेख नसलेले कॅलेंडर कोणीही घेऊ नये असे प्रतिपादन जय शिवराय प्रतिष्ठाणचे अध्यक्ष विजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केले.
स्वामीविवेकानंद यांचा आदर्श घेऊन युवकांनी सामाजिक कार्य केले पाहिजे असे विरेश निला यांनी म्हटले, यावेळी माधव देशमुख,अजय मराठे, संदेश भोंडे, पंडीत मिरगणे, शिरीष जाधव, टिंकु पाटील, दिपक ढावारे, उमेश काळे, आप्पा मोहिते, महावीर कदम, सुदर्शन हांडे, संदिप मिरगणे यांच्या हस्ते गरजु महीलांना साडी वाटप व कामगारांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास युवक कामगार महीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुमित नागटिळक, सुहास गुंड, सागर माने, राहुल वडेकर, विनोद जाधव, किरण नान्नजकर, ज्ञानेश्‍वर लोखंडे, सुरज राऊत, वैभव विधाते, राहुल पिसे, दिनेश घोलप, गणेश वाणी, आदित्य सरवदे, संकेत वाणी, मनोज मोरे, स्वरुप राऊत, विनायक हांडे, राहुल अगवणे, आकाश तावडे आदींनी परिश्रम घेतले.
 
Top