वैराग (महेश पन्हाळे)  सोलापूर भारत स्काऊट आणि गाईड शहरजिल्हा संस्था व जिल्हा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कब बुलबुल स्काऊट गाईड विद्यार्थ्यांचा जिल्हा मेळावा बुधवार दि.७ जानेवारी ते शुक्रवार दि.९ जानेवारी दरम्यान तीन दिवसांचे आयोजन अर्णव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सासुरे फाटा वैराग येथे करण्यात आले आहे .
      या समारंभाचे उद्घाटन बुधवार दि.७ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता होणार आहे .सोलापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख यांच्या हस्ते होणार आहे .या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती मकरंद निंबाळकर तर प्रमुख पाहुणे म्हणून  जि.प.सोलापूरच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती पंडित वाघ ,बार्शी पंचायत समितीचे सभापती भाऊसाहेब काशीद सावित्रीबाई फुले महिला खादीग्रामोद्योग बहुउद्देशीय संस्था बार्शीचे  संस्थापक सचिव रवींद्र कापसे उपस्थित राहणार आहेत .
     बुधवार दि.७ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता शेकोटी कार्यक्रम होणार आहे .या समारंभाचे उद्घाटन मदारगनी मुजावर जि.प.सोलापूरचे उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) यांच्या हस्ते होणार आहे .या कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत जाधव बार्शी पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी तर प्रमुख पाहुणे चांगदेव कांबळे शि.वि.अधिकारी वैराग आणि बाबुराव लाटे केंद्र प्रमुख वैराग हे उपस्थित राहणार आहेत .
      गुरुवार दि.८ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता शेकोटी कार्यक्रम होणार आहे .या समारंभाचे उद्घाटन जि.प.सोलापूरचे  उपशिक्षणाधिकारी (माध्य.)  विष्णू सरगर यांच्या हस्ते होणार आहे .या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी चंदनशिवे जि.प.सोलापूरचे उपशिक्षणाधिकारी (माध्य.) तर प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर महानगर पालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी विष्णू कांबळे व मिलिंद मोरे प्रशासन अधिकारी , नगरपालिका बार्शी  हे उपस्थित राहणार आहेत . 
      शुक्रवार दि.९ जानेवारी रोजी स.९ वाजता शोभायात्रा कार्यक्रम होणार आहे .या कार्यक्रमाचे उद्घाटन सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.जयमाला गायकवाड यांच्या हस्ते होणार आहे .या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अॅड.सौ.सुकेशिनी देशमुख सभापती, महिला व बालकल्याण ,जि.प.सोलापूर तर प्रमुख पाहुण्या  सौ.कल्पना निकंबे - क्षीरसागर सभापती ,समाजकल्याण ,जि.प.सोलापूर आणि श्रीमती अर्चना डिसले मुख्याध्यापिका,सावित्रीबाई फुले प्राथ.विद्यामंदिर वैराग हे उपस्थित राहणार आहेत .                                                                               शुक्रवार दि.९ जानेवारी स.११ वाजता समारोप व बक्षीस वितरण हा कार्यक्रम होणार आहे .या कार्यक्रमाचे उद्घाटन व बक्षिसे वितरण मा.आमदार दिलीपरावजी सोपल यांच्या शुभहस्ते होणार आहे .या कार्यक्रमासाठी विशेष पाहुणे  म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  सुरेश काकाणी(भाप्रसे) हे उपस्थित राहणार आहे .या कार्यक्रमाचे अध्यक्ष विष्णूपंत (तात्या) कोठे (जि.मुख्य आयुक्त सोलापूर) तर प्रमुख पाहुणे म्हणून  सोलापूर जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती मकरंद निंबाळकर ,बाबुराव हंगे कोषाध्यक्ष ,महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट गाईड मुंबई , लक्ष्मण पोले शिक्षणाधिकारी ( माध्यमिक ) जि . प. सोलापूर , राजेंद्र बाबर शिक्षणाधिकारी (प्राथ.)जि.प.सोलापूर ,  , जयकुमार आलमेलकर जिल्हा चिटणीस , शंकर गंभिरे जिल्हा कोषाध्यक्ष , सौ .साधना बेत जिल्हा आयुक्त (गाईड ) हे उपस्थित राहणार आहेत .तरी या मेळाव्यास उपस्थित राहून मेळाव्याचा आनंद द्विगुणीत करावा असे अवाहन रविंद्र कापसे यांनी केली आहे .

 
Top