बार्शी(मल्लिकार्जुन धारूरकर) शासनाने दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने बार्शी तहसिलसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. तहसिलदार बालाजी सोमवंशी यांना यावेळी निवेदन देण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष योगेश सोपल, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तानाजी मांगडे, ऍड्.विकास जाधव, अरुण कापसे, तालुकाध्यक्ष कुमार पौळ, शिवाजी गायकवाड, मनिष चौहान, विजय ठोंगे, अमोल गुडे, ऍड्. नितीन सोडळ, नगरसेविका मंगलताई शेळवणे, राहुल कोंठारे, ज्ञानेश्वर पाटील, संतोष सावळे, अजय तिवारी, संभाजी शेळवणे, आबासाहेब जाधव, आण्णासाहेब कोंढारे, युवराज काटे, अवधूत घोडके आदी उपस्थित होते.
 
Top