उस्मानाबाद - महामहिम राज्यपाल सी. विद्यासागर राव हे सोमवार, दि. 5 जानेवारी रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. 
सकाळी 10-40 वाजता मुंबईहून सिद्धेवर वडगाव हेलिपॅड येथे आगमन. तेथून सकाळी 10-45 ते 11-15 पर्यंत सिद्धेश्वर वडगाव येथे क्षेत्र पाहणी व शेतकऱ्यांशी चर्चा.  स. 11-15 वा. सि. वडगाव हेलिपॅडकडे प्रयाण. स. 11-20 वा. सि. वडगाव येथून भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान, यमगरवाडीकडे प्रयाण. स. 11-35 वा. यमगरवाडी हेलिपॅड येथे आगमन. स.11-35 ते 11-55 भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान, यमगरवाडी येथे राखीव.  स. 11-55 वा. यमगरवाडी येथून तुळजापूर हेलिपॅड कडे प्रयाण. दु. 12-05 वा.  तुळजापूर हेलिपॅड येथे आगमन. दु. 12-10 वा. तुळजाभवानी मंदिराकडे प्रयाण. दु. 12-20 ते-12-50 तुळजाभवानी देवीची पुजा व दर्शन. दु. 12-50 वा. मंदिराहून सर्किट हाऊस, तुळजापूरकडे प्रयाण. दुपारी 1 वाजता सर्किट हाऊस तुळजापूर येथे आगमन व 1-45 पर्यंत राखीव. दु.1-45 ते 2-15 वा. जिल्हा प्रशासनाबरोबर आढावा बैठक. नंतर 2-15 ते 2-30 राखीव. 2-30 वाजता सर्किट हाऊस तुळजापूर येथून टाटा सामाजिक विज्ञान संस्थेकडे प्रयाण. 2-45 वा. टाटा सामाजिक विज्ञान संस्था येथे आगमन. दु. 2-45 ते 3-45 पर्यंत संस्थेच्या राष्ट्रीय ग्रामीण युवा महोत्सवाच्या समारोप समारंभास प्रमुथ अतिथी म्हणून उपस्थिती. 3-45 वाजता संस्थेतून तुळजापूर हैलिपॅडकडे प्रयाण. 4 वा. तुळजापूर हैलिपॅड येथे आगमन. सायंकाळी 4-05 वा. तुळजापूर हेलिपॅड येथून, राजभवन मुंबईकडे प्रयाण. 

 
Top