बार्शी :- सुरज क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने देण्यात येणार्‍या कै.बाबुरावजी डिसले स्मृति जीवन गौरव पूरस्कारांची घोषणा करण्यात आली असून विविध संस्था व व्यक्तींची तेरा नावे जाहीर करण्यात आली आहेत. निवड करण्यात आलेल्या संस्था व व्यक्ती पुढीलप्रमाणे - ह.भ.प.सुखदेव कोळी महाराज (अध्यात्मिक), राजेंद्र (राजा) ज्ञानोबा माने (पत्रकार भूषण)प्रसन्नदाता गणेश मंदिर ट्रस्ट (सामाजिक संस्था), बदीऊज्जमा गुलामदस्तजगीर बिराजदार (साहित्य), विजयकुमार शिवाजीदळवे (क्रीडा), पद्मा शाम दवे-सावजी (सामाजिक),गजानन कृष्णाजी पिसे (कामगार भूषण), झरकर किरण प्रकाश (आधुनिक अक्षर तपस्वी), कालिदास अरविंद सोनवणे (कला), देवेंद्र गणपतराव औटी (सांस्कृतिक), सुलभा सौदागर दिंडे (शैक्षणिक), शोभा श्रीकांत मोरे (महिला भूषण), विनोद सुरेश बोडके (युवा)
दि. ६ जानेवारी २०१५ रोजी अर्णव इंग्लीश मेडियम, सासूरे फाटा, वैराग,ता. बार्शी येथे हे पुरस्कार वितरीत करण्यात येणार आहेत. यावेळी माजी आमदार राजेंद्र राऊत, सिनेअभिनेत्री क्रांती रेडकर, शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, पुणे विभाग, नगराध्यक्ष रमेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य, बाळासाहेब कोरके, डॉ. प्रकाश बुरगुटे, वैरागचे सरपंच संतोष निंबाळकर, पंचासत समितीचे भाऊसाहेब काशिद, राजेंद्र दास, उद्योगपती शिवाजीराव डिसले शेठ हे उपस्थित राहणार आहेत. स्मृतिचिन्ह, सत्मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती सुरज क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष श्री रविंद्र कापसे व सचिव प्रताप दराडे यांनी दिली.
 
Top