उस्‍मानाबाद -  समाजातील गुण, दोष, टिपत समाजाचे आरोग्य सांभाळणार्‍या पत्रकारांनी स्वतःचे आरोग्य देखील सांभाळणे गरजेचे आहे, असे मत जिल्हामाहिती अधिकारी दिपक चव्हाण यांनी उस्‍मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघ व सुविधा हॉस्पीटल अॅड आयसीयू केअर सेंटरच्या वतीने दर्पण दिनानिमित्त (पत्रकारदिन) आयोजित पत्रकारांच्या आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. 
     याप्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष जाधव, सरचिटणीस राजाभाऊ वैद्य, सुविधा हॉस्पीटलचे संचालक गोरख भोसले, डॉ. प्रशांत काशीकर, रवि काटकर , शिला उंबरे आदी उपस्थित होते. प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर व धन्वंतरीचे पूजन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार मोतीचंद बेदमुथा, भाऊसाहेब भन्साळी, एस.ए.सय्यद, अंबादास दानवे, राजेंद्र बहिरे आदींचा सत्कार करण्यात आला. या शिबिरात पत्रकारांची ईसीजी, रक्तदाब, हार्टरेट, ब्लड शुगर व इतर वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. एकूण ५५ पत्रकारांची या शिबिरात डॉ. प्रशांत काशिकर त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी व वैद्यकीय कर्मचार्‍यांनी तपासणी केली. याप्रसंगी पत्रकार धनंजय रणदिवे, देविदास पाठक, राम खटके, बालासाहेब माने,लक्ष्मीकांत शिंदे, धनंजय पाटील, विजय मुंडे, राजेंद्र जाधव, अमदज सय्यद, राहुल कोरे, संजय भन्साळी, लक्ष्मीकांत बनसोडे, आरिफ शेख, दिपक जाधव,संतोष शेटे, संतोष जोशी, सलिम मोमीन, ईस्माइल सय्यद, किशोर माळी, रामेश्‍वर डोंगरे, गिरीष जव्हेरी, मलीकार्जुन सोनवणे, सुभाष कदम, दिपक लोंढे, अरूण गंगावणे, ऍड. राहुल लोंखडे, बिभिषण लोकरे, श्रीराम क्षीरसागर, इम्रान खान आदी पत्रकार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रविण पवार यांनी तर आभार प्रशांत कावरे यांनी मानले. 

 
Top