पांगरी (गणेश गोडसे) :  पोलिस प्रशासनाने मोबाईल सिम कार्ड खरेडीदाराचे संपूर्ण रेकॉर्ड ठेवण्याचे लेखी फर्मान काढल्यामुळे बार्शी तालुक्यातील सिम कार्ड विक्रेत्यांनी एक जानेवारीपासून सिम विक्री बंद केल्यामुळे तालुक्यातील विविध कंपन्यांचे सिम खरेदी करण्याचे काम ठप्प झाले असून निर्बंध मागे घ्यावे अशी विक्रेत्‍यांची  मागणी आहे. ग्राहकांना त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
  याबाबत विक्रेत्यांकडून प्राप्त माहिती अशी की पोलिसांनी लेखी नोटिस देऊन सिम कार्ड विक्रेत्याने सिम विक्री करताना पूर्ण खात्री करूनच सिमची विक्री करावी,सिम खरेदी करते वेळी त्या ग्राहकांकडून दोन प्रतीत दस्तऐवज घ्यावे,पर तालुक्यातील ग्राहकास सिम देतेवेळी स्थानिक नागरिकाशी ओळख घेणे बंधनकारक करण्यात आल्यामुळे विक्रेत्यास अनंत अडचणीस सामोरे जावे लागत आहे.
  सिम कार्ड विक्री गत दहा दिवसापासून बंद असल्यामुळे ग्राहकांबरोबरच विक्रेत्यासही अडचणी येत आहेत.छोट्या विक्रेत्यांवर यामुळे उपासमारीची वेळ आली आहे.
 
Top