पांगरी (गणेश गोडसे) दारू पिल्यामुळे मयत झाल्याच्या कारणावरून दहा ते बारा जनांनी मिळून वस्तीवर जावून महिलेच्या घरातील प्रापंचिक सामानाची मोडतोड करत तिला जातिवाचक शिवीगाळ केल्याची घटना काल दी 1 गुरुवारी रात्री कारी ता.बार्शी येथील डोके वस्तीवर घडली.जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरा जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अतुल बापू गोफणे रा.सातेगाव ता.जि.उस्मानाबाद यांच्यासह दहा ते बारा जणांवर अनुसूचीत जाती जमाती अत्याचार प्रतिबंधात्मक कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
 सौ.राणीबाई राजू पवार रा.डोके वस्ती(कारी) या महिलेने पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की आरोपींनी त्याच्या वस्तीवरील घरी येऊन दादा उत्तम माळवदकर हा तुमच्या येथे दारू पिऊन मयत झाला आहे.तुम्ही आत्ताच्या आत्ता घर सोडून निघून जावा असे म्हणत त्यांच्या घरावरील पत्र्यावर दगड फेकून,घरातील प्रापंचिक सामानाची काठीने मोडतोड,नासधूस केली.रावसाहेब हिप्परकर व श्री.मचाळे हे दोघे भांडणे सोडवण्यासाठी आले असता त्यांनाही शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली.महिलेच्या फिर्यादीवरून पांगरी पोलिसात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास बार्शीचे उपविभागीय अधिकारी करत आहेत.

 
Top