पांगरी: (गणेश गोडसे) जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला व संचित रजेवर गावाकडे आलेला आरोपी रजेची मुदत संपूनही कारागृहाकडे परत आला नसल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी कारी ता.बार्शी येथील एका कैदयावर आज दि.4 रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विजयकुमार उर्फ राजेंद्र मनोहर देसाई रा.कारी असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नांव आहे.
  दत्तात्रय प्रल्हाद हातेकर (रा.कोळा.ता.सांगोला) हल्ली कारागृह रक्षक खुले जिल्हा कारागृह पैठन जि.औरंगाबाद यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की बंदी क्रमांक 4450 श्री विजयकुमार देसाई हा पेठण येथील खुल्या जिल्हा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.त्यास 17 नोव्हेंबर रोजी दोन आठवड्यांच्या संचित रजेवर सोडण्यात आले होते.दि.2 डिसेंबर रोजी त्याने कारागृहात हजार रहाणे बंधनकारक होते.मात्र तरीही तो बंदी कारागृहात हजार झाला नाही.रजेची मुदत संपूनही कारागृहाबाहेर राहिल्याप्रकरणी पांगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पांगरी पोलिस करत आहेत. 

 
Top