उस्मानाबाद- जिल्हयातील सीबीएसई, आय सी एसई,आयबी, आजीसीएसई, सीआई आदि देशातील व विदेशातील शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमाच्या  संलग्तितेसाठी नाहरकत प्रमाणपत्राचे नुतनीकरण करण्याबाबत कार्यपध्दती विहीत करण्यात आल्याची माहिती  जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे  शिक्षणाधिकारी, उस्मानाबाद यांनी कळविले आहे.
या कार्यपध्दती ऑनलाईन पध्दतीमध्ये लिंकचा वापर करण्याचेही निर्देश देण्यात आले होते. परंतु कांही तांत्रिक कारणामुळे लिंग सुव्यवस्थितरित्या चालत नसल्याने इच्छुक शैक्षणिक संस्थांना अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. इच्छुकांनी  अभिलेख्याचे फोटोसह माहिती 7 जानेवारीपर्यत,2015 पर्यत पाठवावीत. 
         परिपत्रकातील परिशिष्‍ट अ मध्ये अर्ज पुर्ण भरुन अभिलेखे स्कॅन करुन फोटो खाली ई- मेलवर cbsenocpune@gmail.com आयडीवर पाठवावेत. परिशीष्ट अ मधील अर्जासह अभिलेख शाळांचे शैक्षणिक/ भौतिक दर्शविणारे फोटो अपलोड करावेत.अभिलेख्याचे फोटोसह माहितीची हार्ड कॉपी विभागीय शिक्षण उपसंचालक, लातूर या कार्यालयात दोन प्रतीत सादर करावी.                                              
 
Top