पांगरी (गणेश गोडसे) या विश्वाचा निर्माता हा एकच असून कोणताच धर्म हा वाईट शिकवण देत नसून सर्वच संतांची शिकवण ही एकता,बंधुता,सलोखा अशीच असल्याचे प्रतिपादन उस्मानाबादचे मौलाना मुखतार यांनी केले ते आज दि.4 रविवारी पांगरी ता.बार्शी येथे इस्लाम धर्माचे संस्थापक महंमंद पैगंबर यांच्या जयंतिंनिमित्त येथील जामा मज्जीद येथे  आयोजित कार्यक्रमात बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाणी रज्जाक बागवान हे होते.यावेळी पांगरीचे सरपंच विजय गोडसे,तंटामुक्ती अध्यक्ष सुहास देशमुख,माजी सभापती विजय गरड,सतीश जाधव,उद्योगपती शीतल जानराव,डॉ.अरीफ शेख,श्री.वाघ,पोलिस उपनिरीक्षक राजू राठोड,जयंत पाटील,विशाल गरड,रियाज बागवान,नशिर पठाण आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.
   विशाल गरड,विलास गोडसे यांनीही यावेळी महंद पैगंबर यांच्या शांततेच्या संदेषाविषयी माहिती देऊन पूर्वीप्रमाणेच भविष्यातही पांगरीत शांतता,जातीय सलोखा अबाधित राहील अशी ग्वाही दिली.प्रारंभी पांगरी गावातून शोभा यात्रा काढून तिचा समारोप मज्जीद समोर करण्यात आला.यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी पैगंबर यांच्याबाबत विचार व्यक्त करून गाणी गायन केली.उपस्थितांना शरबत व मिठाईचे वाटपही करण्यात आले.  कार्यक्रम यश्यस्वी करण्यासाठी शहाजाण बागवान,डॉ.अरीफ शेख,मलंग आतार,महमद शेख,पाशा सौदागार,अकबर बागवान,अकील बागवान,जावेद शेख,अमजद काजी,शकुर इनामदार,जावेद बागवान आदींनी परिश्रम घेतले.

 
Top