उस्मानाबाद -  जिल्ह्यातील सर्व वृध्द कलाकार व साहित्यीकांना सूचित करण्यात येते की, मानधनाबाबतचे प्रस्तावात त्रुटी आढळून आले आहे. सबंधितांनी  त्रुटीची पूर्तता परिपुर्ण  करुन गट विकास अधिकारी, पंचायत समितीयांचेमार्फत 7 फेब्रुवारी,2015 पर्यत जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांचे नावे पाठवावेत, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी जि. प. उस्मानाबाद यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे केली आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने मानधनाबाबतचे प्रस्ताव छाननी केली असता  परिशिष्ट 1 नुसार 2013-14 मधील मा. तहसीलदार यांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र  व वृध्द कलाकार हे शासनाच्या इतर योजनेचा लाभ घेत नसल्याबाबत प्रमाणपत्र नसल्याचे आदि त्रुटी आढळून आल्या असल्याने  मानधन, त्रुटी व अधिक माहितीसाठी वृध्द साहित्यिक व कलावंतानी  जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि. प. उस्मानाबादशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 
Top