उस्मानाबाद - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शेलगाव ता.वाशी येथे 10 मार्च रोजी सकाळी 10 वाजता मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर  राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतंर्गत आयोजित करण्यात आले आहे.   
या शिबीरात स्त्रीरोग, बालरोग, शल्य चिकित्सा, कान नाक घसा तज्ञ व अस्थीरोग तज्ञ सहभागी होऊन उपस्थितांची तपासणी मोफत करणार आहेत. तपासणीतून आवश्यकता भासल्यास रुग्णांना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतंर्गत मोफत शस्त्रक्रिया किंवा उपचारासाठी संदर्भित केले जाणार आहे. तरी परिसरातील पिवळे, केशरी, अंत्योदय व अन्नपूर्ण शिधापत्रिकाधारक रुग्णांनी या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकीत्सक, उस्मानाबाद यांनी केले आहे.                       
 
Top