उस्मानाबाद  -  जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत विविध विकास योजनेची रु. 3 लाखाच्या आतील किंमतीची व उस्मानाबद जिल्हा परीषदेकडील नोंदणीकृत सुशिक्षित बेरोजगार अभियंता व मजूर सहकारी संस्थेसाठी आरक्षीत करण्यात आलेल्या काम वाटप समितीची  बैठक 16  मार्च रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा ‍परिषद, उस्मानाबाद येथे सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे.
सुशिक्षित बरोजगार अभियंतासाठी भूम येथील कृषी गोदाम इमारत दुरुस्ती वियुदतीकरण करणे अंदाजीत किंमत 69 हजार आणि तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील  पशुवैदयकीय दवाखाना श्रेणी- 1 निवासस्थान दुरुस्ती करणे अंदाजित किंमत रु. एक लाख किंमतीचा समावेश आहे.  हे काम  मजूर सहकारी संस्थेसाठी राखीव ठेवण्यात आली कामे आहेत.
यात भूम पंचायत  समितीत महिलांसाठी शौचालय सुविधा करणे अंदाजित किंमत रु. 2 लाख आणि उस्मानाबाद तालुक्यातील बोरखेडा यैथे उपकेंद्राची संरक्षित भिंत बांधकाम करणे अंदाजित किंमत 2 लाख खर्चाची कामे  आरक्षित ठेवण्यात आली आहे. इच्छुक सुशिक्षित बेरोजगार अभियंता / मजूर सहकारी संस्थेनी आपले इच्छापत्र  कार्यकारी अभियंता जिल्हा परीषद, उस्मानाबाद यांचेकडे 11 मार्च रोजी दुपारी 4 वाजेपर्यत दाखल करावयाचे आहे.
प्राप्त झालेल्या इच्छापत्राची छाननी केल्यानंतर पात्र सुशिक्षित बेरोजगार अभियंता / मजूर सहकारी संस्थेची यादी जि. प. बांधकाम विभागाच्या सूचना फलकावर 13 मार्च रोजी प्रसिध्द करण्यात केल्यानंतर पात्र सुशिक्षित बेरोजगार अभियंता / मजूर सहकारी संस्थेस  काम वाटप बैठकीत 16 मार्च रोजी भाग घेता येईल.
काम वाटपाचे नियम व अटी पुढीलप्रमाणे आहेत. सुशिक्षित बेरोजगार अभियंता / मजूर सहकारी संस्थेकडे जिल्हा परीषदेकडील वैध नोंदणीपत्र असणे आवश्यक आहे. इच्छापत्र पत्रासोबत जोडणे आवश्यक आहे. जे सुशिक्षित बेरोजगार अभियंता / मजूर सहकारी संस्थेनी यापूर्वी 5 लाखापर्यंतची कामे केलेली नाहीत अशाच सुशिक्षित बेरोजगार अभियंता / मजूर सहकारी संस्थेना काम वाटपात भाग घेता येईल.
विदयुतीकरणाच्या कामसाठी जि.प कडील विदयुतीकरणाचे पंजीकरण असलेले सुशिक्षित बेरोजगार अभियंता / मजूर सहकारी संस्था पात्र राहतील. सुशिक्षित बेरोजगार अभियंतासाठी आरक्षीत असून तेच  अर्ज करु शकतील. तथापी  मजूर सहकारी संस्थासाठी आरक्षित असलेल्या कामासाठी त्या -त्या तालुक्यातील मजूर सहकारी संस्था अर्ज करु शकतील. काम वाटपाबाबत समितीचा निर्णय अंतिम राहील. असे सचिव, काम वाटप समिती, जिल्हा परीषद, उस्मानाबाद यांनी कळविले आहे.

 
Top