उस्मानाबाद - आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा संपूर्ण राज्यात 22 मार्च रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेस पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जिल्हयातून  21 हजार 900 विद्यार्थी बसले आहेत. त्यांची  बैठक व्यवस्था 107 परीक्षा केंद्रावर करण्यात आली आहे. तसेच माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 17 हजार 115विदयार्थी  परीक्षेस बसले असून त्यांची बैठक व्यवस्था जिल्ह्यात 89 परीक्षा केंद्रावर करण्यात आली आहेत. असे एकुण 196 परीक्षेची  केंद्र निश्चित करण्यात आली आहेत.
परीक्षेचे बैठक क्रमांक संबधित मुख्याध्यापकामार्फत विद्यार्थ्यांना पाठविण्यात आली आहेत. परीक्षेबाबत कांही अडचण अल्यास जिल्हा परीषदचे एस एम जाधव, शिक्षण अधिकारी मो.क्र.-9423766271, एन.आर.जगदाळे,उपशिक्षणाधिकारी मो. क्र.9850042834 आणि एस. एस. माळी विस्तार अधिकारी मो. क्र. 9422991741 वर तसेच संबधित मुख्याध्यापक/ केंद्र संचालकांशी तात्काळ संपर्क साधावा. परीक्षेत कुठलाही गैरप्रकार होणार नाही, यासाठी सर्व केंद्रावर बैठे पथकाची नियुक्ति  करण्यात आली आहे.
परीक्षा सुरळीत व शांततेत पार पाडण्याच्यादृष्टीने सर्व गटशिक्षाधिकारी/ विस्तार अधिकारी शिक्षण/ केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, केंद्र संचालकांनी आपली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत व प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी  जि.प. उस्मानाबाद यांनी केले आहे. 

 
Top