उस्मानाबाद  -  जागतिक मौखिक  आरोग्य दिनानिमित्त जिल्हा रुग्णालय येथे जनजागृती अभियानाची सुरुवात करण्यात आली. 27 मार्चपर्यंत हे अभियान राबविण्यात येणार आहे.
धन्वंतरी पुजनाने  या अभियानाचा शुभारंभ जिल्हा शल्यचिकीत्सक, उस्मानाबाद यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी दंतचिकित्सक डॉ. नागेश होनखांबे यांनी मौखिक आरोग्याबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले.  दातांची निगा कशी राखावी आणि तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने होणाऱ्या दुष्परिणामांबाबतही त्यांनी सविस्तर माहिती दिली.  यावेळी रुग्णालयातील डॉक्टर्स व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अभियान कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात येणार असून जिल्हा रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागामध्ये मौखिक आरोग्यासंदर्भात माहिती देणारे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. याचा लाभ नागरिकांनी घेण्याचे आवाहन जिल्हा रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे. 

 
Top