उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्हा परिषद, उस्मानाबाद अंतर्गत अनुकंपा तत्वावर नोकरी संदर्भात  उमेदवारांनी त्यांच्या मुळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर कागदपत्रांसह 30 मार्च, 2015 रोजी सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद, उस्मानाबाद येथे सकाळी 11 वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे  केले आहे. 
संबंधीत उमेदवारांना यापूर्वीच दिनांक 19 मार्चला स्वतंत्र पत्राद्वारे कळविण्यात आले आहे तसेच संबंधीत उमेदवारांची यादी जिल्ह्याच्या www.osmanabad.nic.in या संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे. तरी संबधित अनुकंपाधारकांनी याची नोंद घ्यावी असेही पत्रकात नमुद करण्यात आले आहे.    

 
Top