उस्मानाबाद - जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी महाराष्ट्र कोषागार नियम 1968 मधील नियम क्र 409 अन्वे प्राप्त अधिकारानुसार उस्मानाबाद जिल्ह्यातील  शासकीय रकमेचा देवाणी-घेवाणीचा व्यवहार करणाऱ्या स्टेट बँक ऑफ हैद्राबादच्या सर्व शाखा व युनियन बँक ऑफ इंडीया शाखा, लोहारा स्टेट बँक इंडीया शाखा, वाशी हया मंगळवार दि .31 मार्च 2015 रोजी रात्री 10 वाजेपर्यंत कामकाजानिमित्त सुरु  ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
सन 2014-15 या वित्तीय वर्षाचे रकमांचे सर्व व्यवहार 31 मार्च रोजी करणे आवश्यक असल्याने जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय व जनतेनी शासकीय रकमेचा बँकेत भरणा करणे व बँकेतून रक्‍कमा काढण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार असल्याचे आदेशात नमुद केले आहे.   

 
Top